HOUSE OF CPS
HOC App सुरू करण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे- आपल्याकडे उत्तम गृहउद्योग आहेत जे सकस, पौष्टिक आणि उत्तम धान्य वापरुन अनेक उत्पादने बनवतात- या सगळ्यांना वाव मिळावा.
आज बरीच वर्ष अनेक मोठी नावे E-Commerce मध्ये काम करत आहेत - या क्षेत्रात उडी घेताना तशी थोडी धाकधूक होती आम्हाला, पण स्वबळावर विश्वास आणि श्री महाराजांचा आशीर्वाद यांच्या जोरावर आम्ही श्री गणेशा केला आज हा प्रवास आणि प्रयत्न दोन्ही सुरू होऊन साधारण वर्ष होईल.
आपली स्पर्धा आपल्याशीच - 'Be better than what we were yesterday.' ते मोठे लोक काय करतात यापेक्षा आपण काय करायचाय हे जास्त महत्त्वाचे - यात भीती नसून स्पष्ट विचार एकच- प्रवास त्यांचा आणि आपला पूर्णतः वेगळा आहे- तुलना स्वाभाविक (कदाचित) होईलही ; पण आपली स्पर्धा आपल्याशीच आहे हे विसरून चालणार नाही.
उद्योजकांमध्ये महिला चमू तितकाच सक्रिय आहे- घर, मुले, संसार सांभाळून त्या स्वतःचे कौशल्य जपत उत्तम पदार्थ देत आहेत, बनवत आहेत - हे चित्र बर्याच शहरांमध्ये दिसले. यामुळे HOC प्रदर्शन प्रतिनिधित्व ही संकल्पना आम्हाला सुचली - नवीन बाजारपेठ सगळ्यांना हवी असते त्यात आमचा खारीचा वाटा आम्ही उचलून धरला. प्रतिसाद अर्थात उत्तमच होता आणि आहे.
प्रसार, प्रचार आणि प्रसिद्धी या तिन्ही स्तरांवर आमचे काम सुरू असते. HOC ला तुम्हा सगळ्यांची पसंती मिळाली हे काही कमी नाही - व्यावसायिक ते घरोबा, मैत्री यावर येऊन ठेपलो आहोत.
हा प्रपंच असाच पुढे सुरू राहील ही सदिच्छा !!!